पहिली प्रवेशासाठी वयाचे नवे नियम लागू

नवीन शिक्षण धोरणानुसार महाराष्ट्र सरकारने पहिलीच्या प्रवेशासाठी वयाची अट बदलली. शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून ज्या मुलांचे वय 31 डिसेंबर 2026 पर्यंत 6 वर्षे पूर्ण असेल त्यांनाच पहिलीच्या वर्गात प्रवेश दिला जाणार. शालेय शिक्षण विभागाने हा नियम कडक केला असून आता केवळ 6 वर्षे पूर्ण असलेल्या मुलांनाच प्रवेशासाठी पात्र मानले जाईल. योग्य वयात शिक्षण सुरू झाल्यास मुलांचा मानसिक व बौध्दिक विकास चांगला होतो.