अत्याचार अन् हत्या! पालकांमध्ये भितीचे वातावरण
नसरापूरमध्ये एका चिमुरडीवर अत्याचार अन् तिची निर्घृण हत्या झाल्यानंतर अवघा महाराष्ट्र संतापला आहे. त्यात पालकांमध्येही भितीचे वातावरण पसरले आहे. आपली चिमुकली बाहेर पडल्यानंतर ती सुरक्षित तर राहिल ना? अशी चिंता त्यांना वाटू लागलीये. आता हा व्हिडिओच पाहा. ज्यात एक आई आपल्या 3 वर्षांच्या लेकीला सांगतीये, कुणाकडे जायचे नाही? कुणी चाॅकलेट खायला दिले तर ते खायचे नाही. बॅड टच केल्यावर घरी सांगायचे.