प्रस्ताव पाठवला- आता मराठी शिकावीच लागणार!

राज्यातील रिक्षा व टॅक्सी चालकांना आता मराठी भाषेचे ज्ञान असणे बंधनकारक होणार आहे. परिवहन विभागाने मोटार वाहन नियमात सुधारणा करण्याचा प्रस्ताव गृह विभागाकडे पाठवला आहे. परवाना देताना चालकाची मराठी बोलण्याची व समजून घेण्याची क्षमता तपासली जाईल. 1 मे पासून याची अंमलबजावणी होण्याची शक्यता असून नियमांचे उल्लंघन केल्यास परवाना रद्द होऊ शकतो. प्रवाशांशी संवाद सुलभ व्हावा, यासाठी हे पाऊल उचलले आहे.