AI तंत्रज्ञानाने तयार केला हुबेहूब बँक चेक

AI तंत्रज्ञानाच्या मदतीने आता बँकेचे चेक देखील तयार केले जाऊ शकतात. सोशल मीडियावर चॅटजीपीटीने तयार केलेला युको बँकेचा एक चेक व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे यावर हुबेहूब सही देखील कॉपी करण्यात आली आहे. हा चेक पाहून नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले असून, भविष्यात यामुळे फसवणूक वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत 45 लाख लोकांनी हा फोटो पाहिला आहे.