भारीच! गाव कसं असावं? अग्रण धुळगाव सारखं असावं
सांगली जिल्ह्यातील अग्रण धुळगाव हे गाव संपूर्ण देशासाठी एक आदर्श गाव बनले आहे. कोणती खासियत आहे या गावात? तर, इथे दररोज संध्याकाळी 4 तास टीव्ही, मोबाईलसारखे उपकरणे बंद केली जातात. हे गाव एक 'अभ्यास केंद्र' बनले आहे. गावचे सरपंच शिवदास भोसले घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देतात. परिणामी, 53 मुलांनी राष्ट्रीय शिष्यवृत्ती, UPSC, NDA सारख्या परीक्षांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे.